कराड नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरुपी तोडगा काढणार : डॉ. अतुल भोसले
-
आंदोलनस्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन, प्रकृतीची केली विचारपूस
कराड, ता. २ : शासनाने नेमलेल्या लाड व पागे समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच अनुकंपावर नेमणूक करावी, यासह अन्य मागण्यांसाठी कराड नगरपरिषदेचे कर्मचारी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या प्रश्नांवर तातडीने कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
कराड नगरपरिषदेसमोर ३० सप्टेंबरपासून बसलेल्या या उपोषणकर्त्यांची डॉ. अतुल भोसले यांनी भेट घेऊन, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या सांगत, याबाबत नगरपालिकेने तातडीने तोडगा काढवा, अशी विनंती डॉ. भोसले यांच्याकडे केली.
यावेळी डॉ. भोसले यांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत तातडीने तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक लावण्याची ग्वाही दिली. तसेच महायुतीचे सरकार आंदोलकांच्या पाठीशी असून, याप्रश्नी कायमचा तोडगा काढण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ग्वाही डॉ. भोसले यांनी आंदोलकांना दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, ग्रामपंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील भोसले, उपाध्यक्ष सदाशिव महापुरे, सेक्रेटरी अनिल गवळी, कार्याध्यक्ष अशोक पवार यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, माजी विरोधी पक्षनेते महादेव पवार, माजी नगरसेवक सुहास जगताप, आप्पा माने, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, रमेश मोहिते, उमेश शिंदे, दिलीप घोडके, वैभव माने, संग्राम चव्हाण, अभिषेक भोसले, अक्षय सुर्वे, सागर लादे, राहूल कुंभार, चेतन थोरवडे, सोपान तावरे, राजेंद्र डुबल, रोहित पवार, सुनील नाकोड, शैलेंद्र गोंदकर, नितीन शाह आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.