-
पंढरपूर शहरात नोदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संचाचे वनोंदणी प्रमाणपत्राचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते वाटप
पंढरपूर (प्रतिनिधी):-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंद असणाऱ्या कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप क्रेडाई पंढरपूरच्या माध्यमातून पंढरपूर येथील पद्मनाथ पॅलेस येथे करण्यात आला. भांड्यांच्या वस्तूचे वाटप मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिचारक यांनी मार्गदर्शन करताना कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी मार्गदर्शन करताना मा.आ.प्रशांत परिचारक म्हणाले की कामगार कल्याण महामंडळ स्वातंत्र्यापासून अस्तित्वात आहे, पंरतू खऱ्या अर्थाने विविध योजनांचा लाभ सध्या मिळत आहे. यामध्ये असंघटीत कामगार, रस्त्यावरती काम करणारे कामगार, घरातील धुणी भांडी काम करणाऱ्या महिला, गवंडी, सुतार व पेंटर हे कामगार नोंदणी करू शकतात. अगोदर कामगारांनी नोंदणी करून घेतली पाहिजे. त्यामधून कामगार मंडळाच्या ज्या योजना आहेत ते त्यांना मिळत आहेत. मुल जन्माला आल्यापासून ते त्यांचे शिक्षण घेईपर्यंत, कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी अनुदान, गंभीर आजारासाठी, महिलेच्या प्रसुतीवेळी व कामगाराच्या अंत्यविधीसाठी कामगार मंडळाकडून अनुदान मिळते. तसेच शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, सामाजिक योजनांचा लाभ कामगारांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी सुधीर गायकवाड सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर, अजिंक्य पवार दुकान निरीक्षक श्रेणी-2, नोंदणी अधिकारी,अमित शिरगांवकर अध्यक्ष क्रेडाई पंढरपूर, आशिष शहा उपाध्यक्ष क्रेडाई पंढरपूर, मिलींद देशपांडे सेक्रटरी क्रेडाई पंढरपूर तसेच क्रेडाईचे सर्व पदाधिकारी व सभासद, बांधकाम कामगार मोठ्या सख्येने उपस्थित होते.