कुरेश कॉन्फरन्सच्या वतीने वेटलिफ्टर रहमान खाटीक सन्मानित
कराड दि . १२ ( प्रतिनिधी )
कराडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजचा विद्यार्थी रेहान अय्याज खाटीक याने वेटलिफ्टींग मध्ये दुसरा क्रमांक मिळविल्या बद्दल कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली भारतच्या कराड येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करून त्यांस शुभेच्छा देण्यात आल्या .
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत देवचंद कॉलेज अर्जुननगर कुरुंदवाड येथे आयोजित आंतरविभागीय वेटलिफ्टींग ( पुरूष व महिला ) क्रीडा स्पर्धेमध्ये रेहान खाटीक याने १०९ किलो वजनी गटाखाली दुसरा क्रमांक प्राप्त केला .
मुस्लीम खाटीक समाजाच्या आणि प्रथम वर्ष बीएसस्सी मध्ये शिकत असलेल्या रेहान खाटीक याच्या लक्षवेधी नेत्रदीपक यशाबद्दल मुस्लीम खाटीक समाजाची देशव्यापी संस्था असलेल्या कुरेश कॉन्फरन्स या संस्थेच्या कराड येथील पदाधिकाऱ्यांनी रेहान खाटीक याचे अभिनंदन करीत त्याचे पुष्पहार, पुष्पगुच्छ,शाल देऊन सत्कार केला . वेटलिफ्टींग आणि शिक्षणामध्ये पुढील काळात रेहान खाटीक याने दैदिप्यमान यश संपादन करावे, अशा शुभेच्छाही कुरेश कॉन्फरन्सच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांस दिल्या .
रेहान खाटीक याच्या ओगलेवाडी येथील निवासस्थानी जावून, कराड येथील, कुरेश कॉन्फरन्सचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष दिलावर खान, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य लियाकत मसुरकर, कुरेश कॉन्फरन्सचे कराड शहर अध्यक्ष बाबासाहेब कलाल, नियोजित शहर उपाध्यक्ष महिबूब मसुरकर , शेरअली मसुरकर, बबलु पन्हाळकर, हामीद खाटीक, फारूक तासगांवकर, नजीर खाटीक, अय्याज खाटीक, वसिम खाटीक , सैफ तासगांवकर या मान्यवरांनी अभिनंदन, सत्कार, करत शुभेच्छा दिल्या .