लोणंदच्या 24 बाय 7 पाणी योजनेचे आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
62.43 कोटीची ‘लोणंद नगरपंचायत पाणी पुरवठा योजना’ मंजूर
अक्षय दोशी
लोणंद,दि.6
लोणंद शहराची सध्यस्थितीतील पाणी पुरवठा योजना ही ग्रामपंचायत कालीन सन 1964 ची आहे. त्यानंतर शहराचे झालेले औद्योगिकीकरण तसेच लोणंद हे शहर मध्यवत असल्याने बाजारपेठेतील वाढता प्रतिसादामुळे शहराची वाढलेली लोकसंख्या तसेच प्रत्येक वष येणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, वाढते नागरीकरण, दळण वळण यामुळे लोणंद शहरास निकषाप्रमाणे मानसी 135 लिटर्सप्रमाणे सुरळीत पाणी पुरवठा होण्याच्या दृष्ठीने नवीन पाणीपुरवठा योजनेची आवश्यकता होती.
आ.मकरंद पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजने अंतर्गत भविष्यातील लोणंद शहराची सन 2055 पर्यंतची वस्तुस्थिती विचारात घेवून रक्कम रु 62.43 कोटीची ‘लोणंद नगरपंचायत पाणी पुरवठा योजना’ मंजूर झाली आहे. सदरची योजना ही ‘वीर’ धरणावरून प्रस्तावित आहे.
वीर धरण येथे इनटेक चेंबर व जॅकवेल ची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच लोणंद नगरपंचायत हद्दीतील शेजारील शासकीय जागेत 8.50 क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. सदर जलशुद्धीकरण केंद्र तसेच वीर धरण येथील पंपिंग स्टेशन हे पूर्णपणे सोलर ऊर्जेवर व ॲटोमेशन तत्वावर आधारित आहे त्यासाठी प्रकल्पात विशेष तरतुद करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र येथे नवीन 12.74 लक्ष लिटर्स क्षमतेचा, सेंट ॲन्स स्कूल येथे 2.97 लक्ष लिटर्स क्षमतेचा नवीन उभारण्यात येणार आहे. तसेच इंदिरानगर व गोटेमाळ येथील अस्तित्वातील उंच पाण्याच्या टाक्या निष्कासित करून त्याठिकाणी अनुक्रमे 4.16 लक्ष लिटर्स व 3.18 लक्ष लिटर्स क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहे. तसेच गोटेमाळ येथे 0.72 लक्ष लिटर्स क्षमतेचे 1 उभारण्यात येणार असून त्यातील पाणी उचलुन सेंट ॲन्स स्कूल येथील 2.97 लक्ष लिटर्स क्षमतेचा नवीनमध्ये सोडण्यात येणार आहे. तसेच सदर योजनेमध्ये गणपती मंदिरापाठीमागील उंच पाण्याच्या टाकीचा (7.50 लक्ष लिटर्स क्षमता) समावेश करण्यात आला आहे.
वीर धरण येथील इनटेक चेंबर व जॅकवेलद्वारे अशुद्ध पाणी पंप करून 15.77 कि.मी.अंतराची राईझिंग मेन पाईपद्वारे लोणंद नगरपंचायत हद्दीतील शेजारील शासकीय जागेतील जलशुद्धीकरण केंद्र येथे येणार आहे. सदर ठिकाणी अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी जलशुद्धीकरण केंद्र येथील नवीन 12.74 लक्ष लिटर्स क्षमतेचा येथे साठवण करून या टाकीद्वारे नैसर्गिकरित्या सदरचे पाणी हे इंदिरानगर, गोटेमाळ व गणपती मंदिरापाठीमागील पाण्याच्या टाकीत सोडण्यात येणार आहेत. तसेच गोटेमाळ येथील सबमधून पाणी पंप करून ते सेंट ॲन्स स्कूल येथील नवीन मध्ये सोडण्यात येणार आहे. आणि सदर सर्व टाकीद्वारे संपूर्ण शहरास मेन पाईप द्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
लोणंद नगरपंचायत पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते व खा.सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खा.नितीन जाधव- पाटील, खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आ.रामराजे नाईक-निंबाळकर, आ.मकरंद जाधव-पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, नगराध्यक्षा सौ.सीमा खरात, उपनगराध्यक्ष रविंद्र क्षीरसागर, नगरसेवक सर्वश्री भरत शेळके, सौ.रशिदा इनामदार, शिवाजीराव शेळके पाटील, सौ.मधुमती गालिंदे, सचिन शेळके, सौ.सुप्रिया शेळके, भरत बोडरे, गणी कच्छी, सौ.दिपाली शेळके, सौ.आसिया बागवान, सौ.दिपाली शेळके, सौ. राजश्री शेळके, सौ.ज्योती डोनीकर, सौ.तृप्ती घाडगे, प्रविण व्हावळ, सागर शेळके, आनंदराव शेळके-पाटील व मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, नगर अभियंता सागर मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.