डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांतून मलकापूरला २०.८० कोटींचा निधी मंजूर
पायाभूत सुविधांसह विविध ४१ विकासकामे लागणार मार्गी; नागरिकांत समाधान
मलकापूर, ता. ६ : कराड तालुक्यातील एक महत्वाचे शहर म्हणून मलकापूरकडे बघितले जाते. या शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले प्रयत्नशील होते. त्यांनी शासनस्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने मलकापूरच्या विकासासाठी तब्बल २० कोटी ८० लक्ष रुपयांचा विकासनिधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून मलकापूर शहरातील पायाभूत सुविधांसह अन्य विकासकामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे या निधीबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
कराड शहरालगत झपाट्याने विस्तारणारे शहर म्हणून मलकापूरला ओळखले जाते. या शहरात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत असतानाही, येथील बराचसा भाग अनेक सुविधांपासून वंचित राहिला होता. त्यामुळे मलकापूर शहराच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी येथील नागरिकांनी डॉ. अतुल भोसले यांच्याकडे केली होती. त्यानुसार डॉ. अतुल भोसले यांनी मलकापूरसाठी खास बाब म्हणून भरघोस निधी मंजूर करावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या कामाची दखल घेत, ना. फडणवीस यांच्या सूचनेनुसार नगरविकास खात्याने ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेंतर्गत मलकापूरातील विविध ४१ विकासकामांसाठी तब्बल साठी २० कोटी ८० लक्ष रुपयांचा विकासनिधी मंजूर केला आहे.
या विकासनिधीच्या माध्यमातून मलकापूर नगरपरिषद हद्दीतील दत्त शिवम कॉलनी येथील कराड ढेबेवाडी रोड ते कुंभार टेलर घरापर्यंतचा रस्ता व पश्चिमेकडील गटर करणे (३५ लक्ष), सुरज पवार दक्षिण बाजूचे हनुमंत शिंगण घरापर्यंत रस्ता करणे – हौसाई परिसर (७५ लक्ष), लाहोटीनगर येथील ओपन स्पेसमध्ये बगीच्या अंतर्गत कामे करणे (२५ लक्ष), लाहोटीनगर येथील व्यायामशाळा अंतर्गत कामे करणे (२० लक्ष), बैलबाजार रोड ते पश्चिमेस दत्तनगर, सुभद्रा नगर, महसूल वनराई अंतर्गत सर्व रस्ते करणे (१ कोटी ५० लक्ष), प्रभाग क्रमांक सहा वाघमारे पाणंद येथील कराड ढेबेवाडी रोड ते श्री. इंगवले यांचे घर ते पोळ शेत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (७५ लक्ष), यादव आर्केड ते कोळी यांचे शेतापर्यंत व हौसाई कन्या शाळा परिसर अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे (५० लक्ष), बैलबाजार रोड ते पूर्वेस स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलपर्यंत रस्ता व गटर करणे (२५ लक्ष), आगाशिवनगर येथील बालाजी कॉलनी अंतर्गत रस्ता व गटर करणे (३० लक्ष), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार तवटे मार्केट ते सुर्वे यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (५० लक्ष), आगाशिवनगर झोपडपट्टी येथील समाज मंदिर अंतर्गत कामे करणे (३५ लक्ष), जॅकवेल आगाशिवनगर येथील स्मशानभूमी अंतर्गत कामे करणे (७५ लक्ष), जय मल्हार कॉलनी ते सूर्यकांत डवरी यांचे घरापर्यंत (आनंदनगर) रस्ते डांबरीकरण करणे व आरसीसी गटार करणे (४० लक्ष), दांगट वस्तीमधील खुल्या जागेत सार्वजनिक वाचनालय बांधकाम करणे (५० लक्ष), दांगट वस्तीमधील श्री. भिसे यांच्या घरापासून श्री. जावळे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (४० लक्ष), मलकापूर मंजूर शहर विकास आराखड्यातील आगाशिवनगर येथील हनुमान नगर ते वांग व्हॅली कॉलनी पर्यंतचा अंतिम विकास आराखड्यातील नऊ मीटर रुंदीचा रस्ता काँक्रिटीकरण करणे (३० लक्ष), अयोध्या कॉलनीमधील डॉ. बाबर यांच्या घरापासून ते उत्तरेस शरद तेरदल यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (५० लक्ष), विठ्ठल देव हौसिंग सोसायटी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (५० लक्ष), आगाशिवनगर देवकर कॉलनी येथील गणपती मंदिर ते अतुल पवार यांचे शेडपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण व आरसीसी गटार बांधकाम करणे (९० लक्ष), प्रभाग क्रमांक आठ मधील भारती विद्यापीठ ते संतोषी माता शिंदे मळा दक्षिणेकडे श्री शिवाजी संभाजी पाटील यांच्या वस्तीपर्यंत पाणंद रस्ता मुरमीकरण, खडीकरण, डांबरीकरण व आर.सी.सी. गटार करणे (७५ लक्ष), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार डी मार्ट ते भारती विद्यापीठपर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (५५ लक्ष), विठ्ठल देव हौसिंग सोसायटीमधील श्री. थोरात यांचे घरापासून ते डॉ. घुणकी यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे (३० लक्ष), सर्वोदय कॉलनी (झोपडपट्टी) समाज मंदिराचे बांधकाम करणे (३० लक्ष), आगाशिवनगर झोपडपट्टी समाज मंदिरालगत येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटर बांधणे (५० लक्ष), आगाशिवनगर झोपडपट्टी येथील कोल्हाटी समाज मंदिराचे बांधकाम करणे (३० लक्ष), गावठाण भागातील वेताळबा देवस्थान जागेस कंपाऊंड करणे व बांधकाम करणे (२० लक्ष), विश्रामनगर यमगर घर ते काशीबाई पार्क रस्ता ते दक्षिणेस अंगणवाडीपर्यंत रस्ता रुंदीकरण खडीकरण करणे (३० लक्ष), आगाशिवनगर येथील जि. प. प्राथमिक आरोग्य केंद्र ते झिमूर यांचे घरापर्यंतचा रस्ता आरसीसी करणे (३५ लक्ष), कराड ढेबेवाडी रोड आगाशिवनगर ते श्री. रसाळ सर यांचे घरापर्यंत रस्ता व गटार करणे (३५ लक्ष), ओम साई रेसिडन्सी कोल्हापूर नाका येथील ओपन जागा विकसित करणे (३० लक्ष), मलकापूर हद्दीतील सर्व हरितपट्टी विकसित करणे (१ कोटी), मलकापूर हद्दीतील सर्व खुल्या जागांना आरसीसी कंपाउंड करणे (१ कोटी), लाहोटीनगर मधील इंदुमतीनगर अंतर्गत रस्ते व आर. सी. सी. गटर करणे (१ कोटी), समर्थनगरमधील दत्तात्रय इंगवले घर ते ओढ्यापर्यंतचा रस्ता भराव, रस्ता काँन्क्रिटीकरण व दोन्ही बाजूस आर सी सी गटर करणे (८० लक्ष), कुंभार डॉक्टर घर ते अजित पाटील घर रस्ता काँक्रिटीकरण व आरसीसी गटर करणे (२५ लक्ष), आबासाहेब मोहिते यांचे घर ते जि.प. शाळा शास्त्रीनगरपर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण व आरसीसी गटर करणे (२५ लक्ष), भगतसिंग कॉलनी शास्त्रीनगर येथील दत्त मंदिर परिसर बगीचा अंतर्गत कामे करणे (२५ लक्ष), कालिदास मार्केट ते पवार वाडा ते राजेंद्र डिंगने ते बोराटे पंपपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व आरसीसी गटर करणे (१ कोटी), मुस्लीम समाज दफन भूमीस आर सी सी कमाऊंड करणे (८० लक्ष), अहिल्यानगर व बिरोबा मंदिर परिसर अंतर्गत रस्ते व गटर करणे (८० लक्ष), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कराड सर्विसिंग ते सावंत यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (६० लक्ष) अशी एकूण २० कोटी ८० लक्ष रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत.
मलकापूरसाठी डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी मलकापूरात जल्लोष साजरा केला. ढेबेवाडी फाटा येथे कार्यकर्त्यांनी साखर – पेढे वाटप करुन, डॉ. भोसले यांचे विशेष आभार मानले. डॉ. अतुल भोसले यांच्यामुळे मलकापूरला मिळालेल्या विकासनिधीमुळे मलकापूरात विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त कार्यकर्ते व मलकापूरवासीयांनी डॉ. भोसले यांचे आभार मानले आहेत.
फोटो ओळी :
मलकापूर : भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे मलकापूरला भरघोस विकासनिधी मिळाल्याबद्दल साखर – पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करताना भाजपाचे कार्यकर्ते.