शरद पवार पक्षाकडून डॉ. संजयकुमार भोसले लढवणार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा
पंढरपूर दि.(हरिभाऊ प्रक्षाळे)
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून प्रशासकीय सेवेत असलेले माजी साखर आयुक्त डॉक्टर संजयकुमार श्रीमंतराव भोसले हे शरद पवार पक्षाची तुतारी हातात घेऊन निवडणूक लढणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रशासकीय सेवेत असताना कामाचा दांडगा अनुभव त्याचबरोबर विविध ठिकाणी प्रशासनामार्फत जाहीर झालेल्या योजनेतून काम केल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये त्या कामाचा उपयोग करत विकास करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील मूळ रहिवासी असल्याने या मतदारसंघातील मतदारांच्या अडीअडचणी त्याचबरोबर विकास कामाची माहिती असल्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडे याबाबत बोललो असता त्यांनी तयारीला लागन्यासाठी सांगितले आहे. दरम्यान यावेळी त्यांना पवार साहेबांनी भगीरथ भालके यांना ही तयारी करायला सांगितले असून त्यांचा मतदारसंघात दौरा सुरू आहे. त्यांना तिकीट मिळाल्यास आपली भूमिका काय असणार असे विचारले असता तुतारी चिन्ह ज्या उमेदवाराला मिळेल त्याचा प्रचार मी करणार आहे. पक्षाने तसेच शरदचंद्र पवार सांगेल तो आदेश मान्य असल्याचेही ते बोलले.