फलटण दि. लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या 3234 D 1 या प्रांताची द्वितीय प्रांतीय सभा रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता संपन्न होणार आहे. ही सभा कराड येथील *हॉटेल सत्यजित व्हीटस* पुणे-बंगलोर रोड येथे होत असल्याची माहिती *प्रांतपाल MJF लायन ॲड. मलिकार्जुन पाटील* यांनी दिली. सदर सभेचे प्रायोजकत्व *लायन्स क्लब ऑफ फलटण*, *लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन* आणि *लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनम* यांनी केलेले असून सदर सभेस सर्व प्रांतीय पदाधिकारी तसेच माजी प्रांतपालांनी वेळेत अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन प्रांतपाल MJF लायन ॲड. एम के पाटील आणि प्रांतीय सचिव डॉ. अभिजीत जोशी यांनी केले आहे.