तुतारीचे उमेदवार अनिल दादा सावंत यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ…
माचनूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ
252 मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाचे अधिकृत उमेदवार अनिल दादा सामंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज माचनुर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.या
वेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राहुल शहा, प्रथमेश पाटील, रविकांत पाटील, दत्तात्रय भोसले, रवींद्र पाटील, पंढरपूर शिवसेनेचे शहराध्यक्ष रवी मुळे, राष्ट्रवादीचे सुभाष भोसले, सुधीर भोसले, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष साधनाताई राऊत, अण्णा सिरसट, काँग्रेसचे फिरोज मुलाणी, संतोष रंधवे, श्याम गोगाव यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी या मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार उभा राहिल्याने मैत्रीपूर्ण लढत होणार असून या ठिकाणी कोणी गद्दारी केली याबाबत सांगितले.
तर उमेदवार अनिल दादा सावंत यांनी या मतदारसंघांमध्ये उच्च शिक्षण मोठे उद्योग यांचा विस्तार करून मतदार संघाचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. या मतदारसंघातील जनतेच्या कायम पाठीशी राहून काम करणारा उमेदवार आहे हे दाखवून देईल मतदारसंघातील अडीअडचणी सोडवून मतदार संघातील जनता माझ्यावर विश्वास दाखवेल असे काम करून या मतदारसंघातून विजयी झाल्यावर आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या साक्षीने बारामती आणि अकलूजला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.