यंदा जनता कर्तृत्ववान आणि सर्वसामान्य नेतृत्वाला संधी देणार!
पंढरपुरात मनसेचे इंजिन सुसाट धावणार
तीन दादांना पडणार एक बापू भारी; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनता यंदा कर्तृत्ववान सर्वसामान्य नेतृत्वाला संधी देणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे बापू, भाजपाचे दादा, काँग्रेसचेदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षचेदादा अशी तीन दादा आणि एक बापू मध्ये थेट लढत होत आहे.
निवडणूक रिंगणात असलेल्या चारही उमेदवारांच्या कामाची तुलना मतदारांकडून केली जात आहे.
यामध्ये विद्यमान भाजपा आमदारांकडून तीन कोटीची विकास कामे केल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा विकास कागदावरच असल्याचा आरोप होत आहे. तर काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीपुरतेच जनतेच्या संपर्कात असतात अशी टीका होत आहे. तर राज्यात शरद पवारांची क्रेझ असलीतरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नवख्या उमेदवाराला संधी दिल्याने ते जनतेपर्यंत पोहोचू शकणार नाहीत असा दावा केला जात आहे. मात्र मनसेकडून देण्यात आलेले उमेदवार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून न काम करता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायमच उपलब्ध असतात.
आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे दिलीप बापू धोत्रे यांनी मागील अनेक वर्षांपासून मतदार संघातील नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले आहे. पंढरपुरातील नागरिकांचा वाढीव कर माफ करणे, हिंदू, मुस्लिम स्मशानभूमी दुरुस्ती , रस्ते खड्डे मुक्त करणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आर्थिक मदत करणे, बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग उभा करून देणे याचबरोबर कोरोना काळात त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती तसेच एकही नागरिक उपाशी झोपणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती.
त्यामुळे दिलीप बापू धोत्रे यांच्याकडे सर्वसामान्यांना मदत करणारे नेतृत्व म्हणून पाहिले जाते.
सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्ते, वीज, पाणी आणि विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरात लवकर एमआयडीसी उभा करणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी दिलीप बापू धोत्रे यासाठी कर्तृत्ववान आणि सर्वसामान्यांच्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवण्याचा निवडून आणण्याचा निर्धार मतदारसंघातील नागरिकांनी केला आहे.