पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय कोकरे तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र ढवळे
पंढरपूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पंढरपूर पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी निवडी संदर्भात पत्रकार भवन येथे पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या प्रसंगी सर्वानुमती नूतन पुढील वर्षाकरिता नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय कोकरे, कार्याध्यक्षपदी राजेंद्र ढवळे,उपाध्यक्षपदी विकास सरवळे, महेश कदम,सचिवपदी विनोद पोतदार, सहसचिवपदी कल्याण कुलकर्णी, खजिनदारपदी कबीर देवकुळे तर प्रसिद्धीप्रमुखपदी रफिक आतार यांची निवड करण्यात आली.
या निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संघाचे मावळते अध्यक्ष अपराजित सर्वगोड यांच्या हस्ते करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष संजय कोकरे यांनी पुढील काळात पत्रकार बांधवांसाठी विविध सामाजिक उपक्रम, पत्रकारांची कार्यशाळा,विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान याचबरोबर पत्रकारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी पंढरपूर पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष अपराजित सर्वगोड, राजकुमार शहापूरकर, दिनेश खंडेलवाल, अविनाश साळुंखे, नवनाथ खिलारे, विठ्ठल जाधव,विकास पवार यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.