सत्यजित पाटणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा. राजाभाऊ शेलार
पाटण दि. २७ ( प्रतिनिधी ) पाटण विधानसभा मतदारसंघातून आपले नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा उमेदवारी अर्ज सोमवार २८ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात येणार आहे. यावेळी पाटण मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राजाभाऊ शेलार यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धिस दिले आहे.
सोमवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता झेंडा चौक पाटण येथून रॅलीच्या माध्यमातून आपण निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहोत. येथील बाळासाहेब देसाई कॉलेजवर सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व विविध नेते, पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे सभा होणार आहे. याच दरम्यान सत्यजितसिंह पाटणकर हे आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील. तरी यावेळी सर्वांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाठीशी आपली ताकत व निष्ठा उभी करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या पत्रकाद्वारे राजाभाऊ शेलार यांनी केले आहे.