कराड दि.11(प्रतिनिधी) ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था ऐरोली नवी मुंबई यांच्या वतीने संस्थेच्या पाच शाळांमधून २००५ पासून दरवर्षी एका शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो.या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार वडोली निळेश्र्वर ता कराड येथील निळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक रामराव जाधव व कापील गावचे सुपुत्र यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश संकपाळ यांचे हस्ते ऐरोली नवी मुंबई येथे प्रदान करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारचे स्वरूप प्रशस्तीपत्र शाल आणि पुष्पगुच्छ असे होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव तुकाराम नांदुगडे तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदिंसह कापील,वडोली निळेश्र्वर गावच्या ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.