Skip to content
आज समाजात स्किझोफ्रेनिया, डिमेन्शिया व डिप्रेशन बायोपोलार मेनिया या मानसिक आजारांची जनजागृती केली तरच जनजीवन आनंदी,सुखी होईल : डॉ अमर शिंदे
इस्लामपूर दि ( प्रतिनिधी)
जनसामान्य व समाजात स्किझोफ्रेनिया डिमेन्शिया, डिप्रेशन बायोपोलार मेनिया, व्यसनाधीनता असे अनेक मानसिक आजार वाढले असून या विषयी समाजात जनजागृती करून गरजूंवर वेळीच उपचार झाले तरच त्यांचे आयुष्य सुखी आणि आनंदी होईल असे मत जागृती मानसोपचार केंद्राचे प्रमुख डॉक्टर अमर शिंदे यांनी व्यक्त केले. ते पुणे सोलापूर रस्त्यावरील जागृती रिहॅबिलिटेशन अँड डिमेन्शिया अल्झायमर केअर सेंटर मध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन कार्यक्रमात बोलत होते. डॉ .शिंदे पुढे म्हणाले -मानसोपचाराबाबत कधीही उशीर करू नका अनेक आजार छोट्याशा उपचारांनी बरे होतात मोठ्या आजारांना जरा वेळ लागतो मात्र उशीर केला तर रुग्णांना आणि कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. डॉक्टर शौनक पाटील यांनी मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याबाबतच्या अनेक सुंदर टिप्स यावेळी दिल्या योग उपासक मिलिंद देशपांडे यांनी मानसिक आजारांना दूर ठेवण्यासाठी महर्षी पतंजली चा अष्टांग योग सर्वांनी अनुसरावा यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते म्हणून योग साधना अवश्यक आहे.यावेळी जागृती संस्थेमध्ये मानसोपचाराचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या दौंड येथील सुश्रुषा नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर केले जागृती केंद्रात उपचार घेणाऱ्या अनेक तरुण-तरुणींनी आम्ही मनो आरोग्य उत्तम ठेवणार हा विश्वास व्यक्त करत दिल हे छोटासा लव यु जिंदगी चाहूंगा मैन तुझे सांज सवेरे अशी सुंदर गाणी आणि अनेक कविता म्हणत आपला उत्साह दाखवून दिले कार्यक्रमाचे प्रारंभी जागृती संस्थेच्या संचालिका विजया शिंदे डॉक्टर अमर शिंदे ,डॉक्टर शौनक पाटील निमंत्रित डी .एस .राव पत्रकार दिलीप क्षीरसागर यांनी दीपप्रज्वलन केले स्वागत रोहिणी माने यांनी केले. सूत्रसंचालन नम्र काजी यांनी तर आभार गरिमा पांडे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निरंजन पंडित, अजय चंदनशिव, पवन काटकर ,सुरेश काटकर ,पूजा बिडगर लहू राठोड ,अरबाज मनियार सिताराम खंडवाला, वेदजा फल्ले प्रियांशु ,रोहिणी माने नंदिनी सेन स्वप्ना विश्वास पुष्पिंदू घरमी गणेश ठोंबरे, ये प्रियांशू जागिड ,अर्जुन बंडगर प्रवीण केदार ,पूनम हत्तीमारे यांच्यासह सर्व कॉन्सिलर्स आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला.
Post Views: 53