जे आमदाराना जमले नाही ते नितिन काळे यांनी करून दाखवले
धनगर समाजासाठी 1 786 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मंजूर.
हरिभाऊ प्रक्षाळे
पंढरपूर (प्रतिनिधी)
भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव नितीन काळे यांनी गेले तीन दिवसापासून मुंबई येथे तळ ठोकून आज शुक्रवार दि. 11 रोजी अखेर धनगर समाजातील गोरगरीब सामान्य लोकांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 1786 अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मंजूर करून आणली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या 1786 घराच्या फाईलवर मंजुरी दिली आहे.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नितीन काळे हे धनगर समाज बांधवांसाठी तन-मन-धन आणि पूर्णपणे झोकून समाजसेवा करीत असलेने त्यांना धनगर समाजामध्ये मानाचे स्थान आहे. त्याचबरोबर भाजपा युवा मोर्चाचे सचिव पदी त्यांचे काम सोलापूर जिल्ह्यात उत्कृष्ट असल्याने त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्यामुळेच आज अखेर धनगर समाज बांधवांसाठी नितीन काळे यांनी 1786 अहिल्या घरकुल योजना मंजूर करून आणली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुक्यातील धनगर समाज बांधवातून कौतुक केले जात आहे.